Monday, 15 July 2019

मंगेश शिंदे गोंदिया पोलीस अधिक्षक तर निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधिक्षक


गोंदिया,दि.१५ः-येत्या आॅक्टोंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत राज्यसरकारने पोलीस प्रशासनात महत्वपुर्ण बदल आज केले.तीन चार महिन्यापुर्वीच करण्यात आलेल्या बदल्यामधील अधिकार्यांनाही हलविण्यात आले आहे.यामध्ये  गोंदियाच्या पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची मुंबई मुख्यालयात पोलीस उपायुक्त बदली करण्यात आली आहे. तर त्यांचे जागी परिमंडळ -३ पुणे शहरचे पोलीस उपायुक्त मंगेश पोपटराव शिंदे यांची गोेंदियाच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.त्याचबरोबर गोंदियाचे अप्पर पोलीस अधिक्षक संदीप ए.आटोळे यांची बदली प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड पुणे येथे करण्यात आली असून त्यांच्या जागेवर  वर्धाचे अपर पोलीस अधीक्षक निखिल एन.पिंगळे यांची बदली करण्यात आली आहे. भंडारा येथील अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर यांची बदली नागपूर येथील लाचलुचपत विभागात अधिक्षक पदावर करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...