मी कुठेही असलो तरी माझे लक्ष भंडारा-गोंदिया जिल्ह्यावरच असते
लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने ईमानेइतबारे कामे केले
साकोली,दि.01ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव आपल्याला मान्य नसून आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकत्र्यानेच नव्हे तर पदाधिकाèयाने इमानेइतबारे काम केल्याची ग्वाही मी स्वतःदेत आहे.त्यामुळे कुणी काहीही म्हणत असले तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करीत येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण मिळून यापेक्षा अधिक जोमाने कामाला लागू अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.ते येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजित भंडारा-गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांच्या सयुंक्त मेळाव्यात रविवारला बोलत होते.
यावेळी भंडारा जिल्हा परिषदेकरीता झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य चेतक डोंगरे यांचा सत्कार खा.पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.मंचावर भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नाना पंचबुध्दे,गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पंचम बिसेन,माजी खासदार मधुकर कुकडे,रामलाल चौधरी,यशवंत सोंनकुसरे,जिल्हा परिषद सदस्य व अनु.जाती आघाडीचे अध्यक्ष मनोज डोंगरे, नंदलाल कुरेझकर, रेखा ठाकरे, युवक अध्यक्ष किशोर तरोणे आदी मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना पटेल म्हणाले की,येणारे दिवस आपल्या सर्वांसाठी चांगले राहणार असून निराश व हताश न होता एकजुटीने कामाला लागावे.पक्षासाठी आपसामधील हेवेदावे बाजुला सारून तनमन धनाने काम करण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे.भंडारा व गोंदिया जिल्हे हे माझे गृहजिल्हे असल्याने मी कुठेही असलो तरी येथील प्रत्येक बाबीवर माझे लक्ष असून आपल्याबद्दल काहीही कुणी म्हटले तरी त्याकडे लक्ष न देता पक्ष बळकटीसाठी व येत्या विधानसभेत आघाडीच्या उमेदवारासाठी ईमानेइतबारे काम करावे असे आवाहन केले.बैठकीला माजी आमदार राजेद्र जैन,दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,मनोहर चंद्रिकापुरे,भंडारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती धनेंद्र तुरकर आदी उपस्थित होते.संचालन जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले.
No comments:
Post a Comment