सडक अर्जुनी,दि.19ः-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येत असलेल्या तालुक्यातील शेंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज कापल्याने या आरोग्य केद्रांतील रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.
सोबतच वीज पुरवठा खंडीत झाल्याने औषधांचेही नुकसान होऊ लागले आहे.गेल्या मार्च महिन्यापासूनचे विजेचे सुमारे 30 हजार रुपयाचे बील थकीत असल्याने वीजेचा पुरवठा खंडीत करण्यात आला.स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषदेकडे वीज बिल देयकासाठी निधी मागितला मात्र जिल्हा परिषदेने तो निधी न दिल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.या भागाचे जिल्हा परिषद सदस्या सरिता विलास कापगते यांनी वीज वितरण कंपनीकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची विंनती केली असून आजच्या सर्वसाधारण सभेत त्या याप्रकरणावर लक्ष वेधणार आहेत.
No comments:
Post a Comment