अर्बन बँकेचे अध्यक्षांची पत्रकार परिषद
देवरी,दि.22- माझ्यावर गेल्या चार वर्षापासून विविध कारणांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाèयांचा सातत्याने दबाव येत होता. माझा काहीही दोष नसताना ज्याने पक्षविरोधी कारवाया केल्या त्याच्या भल्यासाठी मला अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी सतत दबाव टाकला जात होता. यामुळे मी पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर स्वकर्तृत्वाच्या बळावर बँकेचे अध्यक्षपद मिळविले असताना आणि कोणतीही चूक केली नसताना किंबहुना राजीनाम्याचे कारण पक्ष नेतृत्व सांगत नसताना माझा श्वास त्या पक्षात गुदमरला होता. स्वाभिमानी व्यक्ती राष्ट्रवादीत टिकत नाही आणि टिकणार नाही, अशी माझी धारणा झाल्याने मी त्या पक्षाचा त्याग केला. राष्ट्रहितासाठी झटणाèया भाजपचे विचार मला पटले आणि मी त्या विचारांच्या आधारे समाजाची सेवा करावी या उद्देशाने भाजपमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात प्रवेश केला, असा खुलासा दि भंडारा अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन यांनी काल न्यू दिल्ली हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
No comments:
Post a Comment