Tuesday 23 July 2019

आयकर परतावा भरण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ

नवी दिल्ली,दि.23 - अद्यापही आयकर परतावा न भरलेल्यांसाठी केंद्र सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयकर विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे.
 गेल्यावर्षीपर्यंत विलंबाने आयकर परतावा भरणाऱ्यांकडून ठराविक दंड आकारण्यात येत होता. मात्र, गेल्यावर्षी नियमात बदल केला असून दंडाची रक्कम वाढवली आहे. पण, या दंडापासून वाचण्यासाठी सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली आहे. 
केंद्र सरकारने आयकर कायद्यात २३४ F या नव्या नियमाची भर घातली आहे. यानुसार, मुदतीनंतर आयकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना १३९ (१) मधील तरतुदीनुसार दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. म्हणूनच आयकर परतावा मुदतीत भरणे आवश्यक आहे. त्यामुळे ही नवी संधी समजून 31 ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न्स भरणे फायद्याचे ठरेल. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...