Wednesday, 3 July 2019

ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये नवोगतच्या हातांनी वृक्षारोपण


देवरी: 3 स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे जागतिक पर्यावरण दिनाचे   औचित्य साधून वृक्षारोपनाचे कार्यक्रम *प्राचार्य डॉ सुजित टेटे* यांच्या मार्गदर्शनात राबविण्यातआले.
यावेळी शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आले असून वर्षभर त्या वृक्षांची निगा राखण्याची शपथ यावेळी त्यांना देण्यात आली.
या वेळी शाळेतील शिक्षकांनी सुद्धा वृक्षारोपण करून *एकच लक्ष 33 कोटी वृक्ष* ही संकल्पना राबविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
सदर कार्यक्रमाला मूर्तरूप देण्यासाठी शिक्षक नितेश लाडे, विश्वाप्रित निकोडे, राहुल मोहूर्ले, हर्ष वैष्णव , हर्षदा चारमोडे, वैशाली मोहूर्ले आणि विश्वजित निकोडे यांनी सहकार्य केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...