गोंदिया दि.१५
गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक मध्यानंतर कार्यालयातून बेपत्ता झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.त्यांच्यामुळे अनेक कामे रखडली गेली तसेच माहितीकरीता आलेल्याना ते कार्यालयातून बेपत्ता असल्यामुळे अर्धवट माहिती घेऊन जावे लागले.अधिक्षक संजय डोंगरे हे दुपारी चहापान घ्यायला कार्यालयातून गेले ते परत आलेच नाही.त्यातच माहिती अधिकारसंबधी असलेली माहिती घेण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला ४.४५ ते ५.५५ वाजले तरी ते न आल्याने परत जावे लागले.त्यांनी अर्धेदिवस रजेचा अर्ज सुध्दा टाकले नसल्याचे कळले.तसेच कार्यालयातील कर्मचारी यांना ते कुठे गेले याची कल्पना नसल्याने त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नाटरिचेबल असल्याचे संदेश येऊ लागले.कार्यालयात वरिष्ठाना माहिती न देता किंवा रजेचा पत्र न देता अनेकदा हे दुपारनंतर गैरहजर राहत असल्याचे कार्यालयीन कर्मचारी यांच्याकडून कळल्याने विभागप्रमुखाचे अधिनस्थ कर्मचार्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

No comments:
Post a Comment