Saturday, 20 July 2019

अंगणवाडी सेविका,मदतनिसांचा आ.अग्रवालांच्या विरोधात मोर्चा

गोंदिया-- महाराष्ट्र राज्य आंगनवाडी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक गोंदिया जिल्ह्याच्यावतीने आज शनिवार 20 जुर्लेला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या विरोधात मोर्चा काढून विधानसभेच्या अधिवेशनात अंगणवाडी सेविकांबद्दल काढलेल्या शब्दावर माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या पाल चौक कार्यालयातून हा मोर्चा अंडरग्राऊंड मार्गे बाजार परिसर,गोरेलाल चौक,जयस्तंभ चौकातील नव्या प्रशासकीय इमारतीसमोर पोचला.मोर्च्याचे नेतृत्व  आयटक जिलाध्यक्ष कॉ हौसलाल रंहागडाले,जिला सचिव रामचंद्र पाटील,भाकपा के जिला सचिव मिलिंदकुमार गणवीर ,जिला अध्यक्ष शकुंतला फर्टिंग,जिला सचिव अमरकला डोंगरे,आम्रपाली डोंगरे,विणा गौतम,सरिता भांडारकर,प्रेमलता तेलसे,शकुंतला हेमने,कुसुम लिचडे आदी आंगनवाड़ी कर्मचारी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.या मोर्च्यामुळे जयस्तंभ चौकातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.आमदार गोपाल अग्रवाल यांनी विधानसभेच्या अधिवेशनात अंगणवाडी सेविका या आहार पुरवठ्यामध्ये हेराफेरी करीत असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी करीत चोरीचा आरोप लावला असा आंदोलकांचे म्हणने आहे.आपल्या वक्तव्यावर आ.अग्रवालांनी जाहिर माफी मागावी अशी मागणी केली.सोबतच द्वाआंगनवाड़ी कर्मचारीचे वेतन वृद्धि पेंशन 5 प्रतिशत मानधन वाढ करणे,शुध्द पिम्याची सोय करणे व अंगणवाडीची इमारतीची सोय करुन देण्याएैवजी  द्वेष भावनेने आंगनवाड़ी कर्मचारि विरोधात विधानसभेत विचार ठेवल्याचे म्हटले आहे. या आंदोलनात जिल्ह्यात सर्व अंगणवाडी सेविका,मदतनिस सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...