Sunday 18 June 2017

कोरंभी तलाव खोलीकरणात कंत्राटदार अग्रवालची मनमानी,अधिकारी गप्प



अर्जुनी मोरगाव,दि.18- ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता लघुपाटबंधारे विभाग व कंत्राटदार कोरंभी येथील तलाव खोलीकरण कामात मोठा गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप कोरंभीच्या सरपंच रेखा कोडापे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या कामावर ग्रामपंचायतीने आक्षेप घेतल्यावरही वरिष्ठांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्यातच या कामाचे कंत्राटदार गोंदियातील अग्रवाल नामक व्यक्ती असून नरेश धरमशहारे यांच्या जेसीबी मशिन व ट्रक्टरने अवैधरित्या मुरूम विकण्याचे काम करीत असताना अधिकारी गप्प असल्याचा प्रश्नही सरपंच कोडापे यांनी उपस्थित केला आहे.
कोरंभी येथील तलावाच्या खोलीकरणाचे काम गेल्या पाच-सहा दिवसापासून सुरू आहे. या कामासंदर्भात ग्रामपंचायतीला अंदाजपत्रक किंवा साधी माहिती देखील देण्यात आली नसल्याचे श्रीमती कोडापे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले, तलाव खोलीकरणाचे काम सुरू असले तरी, हे काम गाळ काढण्याचे आहे की, खोलीकरणाचे हे देखील स्पष्ट झाले नाही. सदर काम गाळमुक्त तलाव करून ते सुपिकतेच्या नावावर शिवारात टाकायचे असते तर खोलीकरणात मुरू काढण्याचे काम असते. या कामावर ग्रामपंचायतीने आक्षेप घेतल्यावरही हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे या कामात संगनमताने मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सरपंच कोडापे यांनी केला असून, याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.मनमर्जी काम करुन अधिकार्यांना खिशात ठेवणारा तो अग्रवाल कंत्राटदार कोण अशा प्रश्न अर्जुनी मोरगाव तालुक्यात विचारला जाऊ लागला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...