Tuesday 6 June 2017

तंत्रज्ञान आधारित शेती प्रशिक्षणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला २३० कोटी- निलंगेकर



नवी दिल्ली दि. 5 : शेतक-यांच्या मुलांना तंत्रज्ञान आधारीत प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने २३० कोटी रूपयांना मंजुरी मिळाल्याची  माहिती राज्याचे  कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
श्री. पाटील यांनी आज येथील शिवाजी स्टेडीयम स्थित कौशल्य विकास मंत्रालयात केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) राजीवप्रताप रूडी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीनंतरश्री. पाटील यांनी ही माहिती दिली. या बैठकीस राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे आयुक्त इ. रविंद्रन यांच्यासह केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील शेतक-यांच्या मुलांना तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने आखला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार आजच्या बैठकीत श्री. रुडी यांनी या कार्यक्रमासाठी २३० कोटी रूपयांना मंजुरी दिली आहे.राज्य शासन, सकाळ माध्यम समूह आणि इस्त्रायल येथील हिब्रू विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राज्यातील २ लाख ८० हजार शेतक-यांच्या मुलांना या प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील म्हणाले.
राज्याच्या कौशल्य विकास कार्यक्रमांना कम्राक्रमाने अर्थ सहाय्य करणार- राजीव प्रताप रूडी
या बैठकीत राज्याच्यावतीने  कृषी क्षेत्रात रोजगार, महिला व युवकांसाठी रोजगार आदी विषयांवर आखण्यात आलेल्या सहा कौशल्य विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पांबाबत केंद्र शासन सकारात्मक असून टप्या-टप्याने या प्रकल्पांना आर्थिक सहायता पुरविण्यात  येईल, असे आश्वासन केंद्रीय कौशल्य विकास मंत्री श्री. रूडी यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...