संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे यांच्या अध्यक्षतेखाली १0 जून रोजी समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चुडामन लांजेवार, जिल्हा सचिव सुरेश चóो, जिल्हा युवाध्यक्ष संजय चóो, प्रचार प्रसार प्रमुख विजय चन्ने, रणधीर सूर्यवंशी, अमोल लांजेवार,दादाजी कावळे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मुख्य म्हणजे, नाभिक समाजातर्फे गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन देवरी ऐवजी सौंदड येथे येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात तर देवरी येथे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात वरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेउपक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र फुलबांधे, मारोती उरकुडे, राहूल लांजेवार, अमोल लांजेवार, वामन सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, विजय शेंडे, हटवार यांनी शपथ घेतली. तसेच समाज बांधवांनी सोहळे यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक रणधिर मेर्शाम यांनी केले. संचालन अमोल लांजेवार यांनी तर आभार योगेश सूर्यवंशी यांनी मानले.
No comments:
Post a Comment