Friday 16 June 2017

नागरिकांना सारे फुकट हवे!-शिक्षणमंत्री विनोद तावडे



कल्याण,दि.16 : शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे, तर दुसरीकडे नागरिकांना रस्ते चांगले हवेत, पण टोल भरायचा नाही. आता नेचर पार्क उभारले जाणार आहे. त्याची देखभाल-दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न आहे. नागरिकांना सगळेच फुकट हवे आहे. राजकीय लोकांनी त्यांना फुकट देण्याची सवय लावली आहे, अशी टीका राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्या मतदारसंघात नेचर पार्क उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.
नंतर प्रवेशसोहळ््यात बोलताना शिक्षणमंत्र्यांनी आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही. तर माहिती देतो आणि आपल्या परीक्षा पद्धतीत, अभ्यासक्रमात पाठांतरावर भर दिला जातो, यावर बोट ठेवले. शिक्षकांच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरवेळी एका प्रश्नाचे एकच उत्तर असू शकत नाही. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खाली असाच का गृहीत धरला जातो? एका विद्यार्थिनीने वधू हा शब्द लिहिल्यावर तिला गुण दिले गेले नाहीत, हे त्यांनी दाखवून दिले. वस्तुनिष्ठऐवजी वर्णनात्मक उत्तरेही यायला हवीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यासाठी ओपन बुक पॅटर्न राबवावा लागेल, असे त्यांनी सुचवले.
सीबीएसई आणि आयसीएसई पॅटर्नमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा असते. एसएससी बोर्डात मात्र अर्ध्या अभ्यासावर असते. यातून पुढे पाठ मागचे सपाट असा प्रकार होत असल्याची टीका त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...