Friday 23 June 2017

सीईओ पुरामांना सोडेना अन वालकेना रूजू करेना


गोंदिया,दि.23-गोंदिया जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम हे तसेही वादातीत अधिकारी राहिले आहेत.गेल्या एकवर्षापुर्वी पंचायत विभागातील एका कर्मचार्याने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्यांच्या कुटूबियांने संबधित अधिकार्याच्या त्रासामुळे झाल्याचे म्हटले होते.त्यानंतर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा प्रभार असताना देवरी येथे शासकीय वाहनातून त्यांनी घराच्या बांधकामाचे साहित्य ने आण केल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते.सोबतच कर्मचारी बदली व पदोन्नतीमध्ये पुराम यांनी अनेक शासननिर्णयांना डावलून आपल्यावर अन्याय केल्याची ओरड अनेक कर्मचारी आजही करीत आहेत.अशा पुराम साहेबांची बदली शासनाने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागात केली.परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचे प्रमोटी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या बदलीचे आदेश येऊनही सोडण्याची तसदी घेतली नाही.पुराम यांना कधी सोडणार पुराम यांच्या जागेवर 15 दिवसापुर्वीच आर्डर झालेले भंडारा जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुाकअ वालके हे रुजू होण्यासाठी नियमित येत असताना त्यांना रुजू का करुन घेत नाही यासंदर्भात विचारणा करण्याकरिता शासकिय दुरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बैठक सुरु असल्याचे निमित्त करुन नंतर बोलतो असा निरोप पाठवून या प्रकरणावरच बोलायला टाळले.जेव्हा की वालके यांची पोस्टींग गोंदिया जिल्हा परिषद सामान्य प्रशासन उपमुकाअ या पदावर झालेली असताना आणि संबधित अधिकारी रूजू होण्यासाठी दररोज हेलपाट्या मारत असताना सीईओ त्यांना रूजू का करीत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.जेव्हा पुराम यांची सुध्दा बदली झाल्याने त्यांच्या जागेवर वालकेंना रूजू करुन घ्यायला हवे होते.या आधी पुराम यांचे आदेश नसल्याने रूजू करता येत नाही असे सांगणारे सीईओ ठाकरे आता मात्र पुराम यांचे बदली आदेश आल्यानंतर गप्प का बसले कुठल्या आमदारांने,मत्र्यांने त्यांना वालके यांना रूजू न करण्यास व पुराम यांना कार्यमुक्त न करण्यास सांगितले याचा खुलासा केला तर प्रशासकीय व्यवस्थतेवर लोकप्रतिनिधींचे वर्चस्व कसे आहे हे स्पष्ट होईल.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...