Tuesday 6 June 2017

शेतक-यांच्या प्रश्नावरून शरद पवार मोदी भेट

नवी दिल्ली,दि.06- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी संप आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी पवार यांनी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रातही द्या, अशी मागणी मोदींकडे केली. परंतु, मोदी यांनी शरद पवार यांची बोळवण करून सरसकट कर्जमाफी देण्यास नकार दिला.
शरद पवार यांनी यावेळी शेतकरी आत्महत्येवरूनही मोदींशी चर्चा केली. ते म्हणाले की, ‘देशभरात दरवर्षी १२ हजार आत्महत्या होतात, अशी सरकारची सर्वोच्च न्यायालयातील आकडेवारी सांगते. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांत ही आकडेवारी सगळ्यात जास्त आहे. या तीन राज्यांमध्ये कर्जमाफीची गरज जास्त आहे. म्हणून तुम्ही हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा.’ महाराष्ट्रातले शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नसल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
यावर बोलतांना नरेंद्र मोदी यांनी कर्जमाफी ही उत्तर प्रदेशसाठी होती इतर राज्यांसाठी नव्हती. तसेच मालाचे नुकसान शेतकरी करणार नाही असेही म्हणाले. सरसकट कर्जमाफी न करण्याचे संकेत देत मोदींनी ‘राज्यातील परिस्थितीवर राज्य सरकार निर्णय घेईल,’ असे सांगून शरद पवार यांची बोळवण केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...