Friday 9 June 2017

नवयुवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे- जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.९- येत्या ७ जुलै या मतदारदिनी जिल्ह्यातील सर्व नवयुवकांनी आपले नाव मतदार यादीत न चुकता नोंदविण्याचे आवाहन गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
१ जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने १ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये १८ ते २१ वयोगटातील नवयुवकांनी आपले नाव मतदार म्हणून नोंंदणी करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन नवीन मतदारांकडून नमुना ६ भरून घेतील.
राजकीय पक्षांनी सुद्धा या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी काळे यांनी केले आहे. याशिवाय जे मतदार मृत पावले असतील वा ज्यांचे नाव एका पेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी केले असेल, अशांनी आपले नाव वगळण्यासाठी नमुना ७ भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच नावातील चुका दुरुस्त करण्यासाठी मतदारांनी नमुना ८ भरून मतदान अधिकाèयांच्या सुपूर्द करावे. ज्या मतदारांचे ओळखपत्रावर फोटो नसेल अशांनी आपले फोटो तहसील कार्यालयात जमा करावे. विशेषतः महिलांना मतदार नोंदणी कार्याकडे विशेष लक्ष देऊन आपले अचूक नाव मतदार यादीत येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन श्री काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...