Wednesday 21 June 2017

सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

भंडारा,दि.21 : खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना कमी दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार कृषी केंद्र संचालकांकडून होत असतो. त्यामुळे भरारी पथकाने कृषी केंद्राची तपासणी केली असता सहा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांना विक्रीबंदचे आदेश बजावले आहे.
भंडारा येथील मे श्री साई कृषी केंद्र, बोरगाव येथील मे राधाकृषी केंद्र, बारव्हा येथील लोथे कृषी केंद्र, बारव्हा येथील कृषी साधना कृषी केंद्र, दिघोरी मोठी येथील श्रीराम कृषी केंद्र व लाखांदूर येथील पुर्ती कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी हंगामात मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील यशोदा या सिड्स कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली होती. उपवन क्षमता नसलेले बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरिता जिल्हा परिषद कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. यात एक पूर्ण वेळ व २३ अर्धवेळ गुणवत्तानियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर देखरेख ठेवतात. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रांची नियुक्ती केली असता त्यात उपवन केंद्राची परवान्यात नोंद न घेता परस्पर साठा विक्री करणे, बिल बुकामध्ये तफावत असणे, बिल बुक साठा नोंदी व दुय्यम या तिन्हीची बेरीज न जुळणे, विक्री अहवाल सादर न करणे, विक्री अहवाल आॅनलाईनवर न टाकणे, चांगल्या ब्रांडखाली नकली निविष्टा विक्री करणे, विक्री बिल शेतकऱ्यांना न देणे व सही न घेणे, दस्तावेज बरोबर न ठेवणे आदी त्रृट्या आढळून आल्यामुळे भंडारा व लाखांदूर तालुक्यातील या सहा कृषी साहित्य विक्रेत्यांवर बंदी घातली. बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बि बियाणे अधिनियम १९६८ व बियाणे अधिनियम १९६६ च्या कलमान्वये कारवाई करून कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...