Wednesday 14 June 2017

ओबीसी चळवळ आणि छोट्या राज्याची चळवळ विकास साधणारी- महादेव जाणकार


चंद्रपूर,दि.१४- ओबीसी समाज बांधवांनो एकत्र येऊन ओŸबीसी चळवळ यशस्वी करून त्यातून समाजाची प्रगती साधून घ्या. चळवळ चालवत असताना सरकारशी समायोजन करून घ्या व घटनादत्त अधिकार पदरात पाडून घ्या. सोबत लहान राज्य असणे हे समाजाच्या व प्रदेशाच्या उन्नतीसाठी चांगले आहे. लहान राज्यातून विकास साधता येतो, अशी भूमिका वरिष्ठ कॅबिनेट मंत्री ना. महादेव जाणकार यांनी चंद्रपूर येथे मांडली.
ना. जाणकार हे स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयातील श्रीलीला सभागृहात गेल्या सोमवारी (दि.१२)चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ओबीसी नेते तथा जिल्ह्यातील सामाजिक कार्यातील अग्रणी डॉ. अशोक जीवतोडे याच्या हस्ते ना. जाणकार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यासोबत संस्थेचे प्राचार्य,मुख्याध्यापक,पदाधिकारी,शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, ओबीसी महासंघाचे निमंत्रक सचिन राजूरकर, माजी प्राचार्य सुधाकर उमाटे, रावजी चवरे, प्राचार्य डॉ. एम सुभाष, विमाशिचे सहकार्यवाह सुधाकर आडवाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक डॉ. जीवतोडे यांनी केले. यावेळी बोलताना ना. जाणकार म्हणाले की, शिक्षण महर्षी कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख, श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी महाराष्ट्रात त्या काळात ज्ञानगंगा घरोघरी पोचवली आणि त्यातून बहुजनांची मुले सुशिक्षित झाली. त्यामुळे आज बहुजनांची मुले मोठ्या पदावर पोचू शकली.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ हे ज्ञानदानासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
ओबीसी समाज मोठा आहे. आता हळूहळू संघटित होऊ लागला आहे. या समाजाने चळवळ मजबूत करायला हवी. सोबतच विदर्भाची चळवळ ही लहान राज्यास पूरक असून विकास व उन्नती साधणारी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या चळवळी मोठ्या ताकदीने उभ्या आहेत, त्या यशस्वी होऊ द्या,अशा शुभेच्छा ना. जाणकार यांनी उपस्थितांना दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.रवी वरारकर यांनी केले. उपस्थितांचा आभार प्रा. महेश वर्दी यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...