Friday 9 June 2017

मुख्यमंत्र्यांकडून मध्यावधीची तयारी, शिवसेनेला सोडणार

मुंबई : राज्यात डिसेंबरच्या सुमारास राज्यात मध्यावधी निवडणुका घेऊन बहुमताच्या जोरावर केवळ भाजपचेच सरकार निवडून आणण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत आता कधीही निवडणुकीसाठी तयार राहा अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्यावधी निवडणुका लागल्यानंतर भाजपकडे येणाऱ्यांची संख्या वाढणार असून त्यात शिवसेनेचे नेतेही असतील याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधल्याचे सूत्रांनी सांगितले. 
सत्तेत असूनही शिवसेनेने सतत विरोधाची भूमिका घेत आहे. त्यामुळे त्यांची संगत सोडणेच बरे या निर्णयावर आता भाजप नेते आले आहेत. शिवसेनेची विरोधी भूमिका, विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा, शेतकरी संपामुळे राज्यात भाजपविषयीचे वातावरण अशा सगळ्या विषयांवर संबंधित बैठकीत चर्चा झाली. मध्यावधी निवडणुका लागल्यास भाजपला कितपत यश मिळेल? हा या बैठकीतला महत्त्वाचा विषय होता. याच विषयावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप मंत्र्यांची मते जाणून घेतली. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 
शिवसेनेचे 62 आमदार असून मध्यावधी निवडणुका झाल्यास ही संख्या निम्म्यावर येईल असे भाजपला वाटते. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या सर्व्हेनुसार भाजपची ताकद 122 वरून 175 ते 200 च्या आसपास जाण्याचे अंदाज खासगी पाहणीतून वर्तवण्यात आले आहेत. शिवसेनेचे मोठ्या ताकदीचे आमदार असलेल्या मतदारसंघांवरही लक्ष केंद्रित करून भाजपची ताकद वाढवा अशा सूचना फडणवीसांनी या बैठकीत दिल्याचे सूत्रांकडून कळाले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...