Thursday 8 June 2017

चारा न दिल्याने शेळीने खाल्ल्या 62 हजारांच्या नोटा


india news goat eats notes national news marathi news

कनौज,दि.8 - उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्याला शेळीला वेळेवर चारा न देणे महागात पडल्याची घटना घडली आहे. शेळीने मालकाच्या खिशातील 62 हजार रुपयांच्या नोटाच चक्क चावून खाल्ल्या.
सर्वेशकुमार पाल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो तालग्राम भागातील सिलुआपूर गावातील रहिवासी आहे. पाल याने विजारीच्या खिशात दोन हजार रुपयांच्या 33 नोटांचा बंडल ठेवला होत्या. हे पैसे त्याने विटा खरेदी करण्यासाठी आणले होते. पैसे असलेली विजार बाहेर अडकवून तो स्नानगृहात स्नानासाठी गेला होता. शेजारी बांधलेल्या शेळीने विजारीच्या खिशातून बाहेर डोकावत असलेल्या नोटा चावून खाण्यास सुरवात केली. पाल स्नान आटोपून बाहेर आले त्या वेळी शेळी नोटा चावून खाताना दिसली. त्यांनी शेळीच्या तोंडातून नोटा बाहेर ओढण्याच्या प्रयत्न केला; मात्र केवळ दोन नोटांचे तुकडे त्यांच्या हाती आले. शेळीने तोपर्यंत दोन हजार रुपयांच्या 31 नोटा म्हणजेच 62 हजार रुपये चावून फस्त केले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...