Tuesday 6 June 2017

'शेतकरी आंदोलनामागे विरोधकच-मुख्यमंत्री



नवी दिल्ली,दि.06-राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात कुणीही शेतकरी सहभागी झालेला नाही. 'महाराष्ट्र बंद'च्या नावाखाली रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ कोण करत होतं, याची माहिती आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांच्या मागे लपून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत, परंतु बळीराजाला सगळंच ठाऊक आहे, अशी चपराक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना लगावली. 
खऱ्या शेतकऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करायला सरकार तयार आहे आणि अल्पकर्जधारक शेतकऱ्यांना ३१ ऑक्टोबरआधी कर्जमाफी मिळणारच, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मागच्या काळात कर्जमाफीसाठी जसा घोटाळा झाला, तसा होऊ नये म्हणून माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण कर्जमाफीसह हमीभाव आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या पाच दिवसांपासून संपावर गेले आहेत. सोमवारी तर विविध शेतकरी संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ पुराकला होता. त्याला उत्तर महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपला तीव्र संताप व्यक्त केला. बळीराजा आक्रमक झाल्यानं हा संप आणखी चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. परंतु, हे आंदोलन शेतकऱ्यांचं नसून विरोधकांचं असल्याचा पुनरुच्चार आज मुख्यमंत्र्यांनी केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...