Saturday, 17 June 2017

मॅग्निज चोरीप्रकरणी सात आरोपींना अटक

देवरी,दि.16- पोलीस ठाण्याअंतर्गत भागी येथे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून टिप्परमध्ये भरलेला मॅग्निज बाहेर काढून भेसळ करणार्‍या सात आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सोमवारी १२ जून रोजी करण्यात आली.
आरोपी अंशूल अग्रवाल, शिव परिहार, राजू सरदार, रत्नपाल, शेरू पठाण, टिप्परचालक गोठारा सालीकराम डोंगरे व काशीराम हे सर्व टिप्परने शासकीय मॅग्निजची चोरी करताना आढळून आले. उपरौक्त आरोपी हे कंपनीच्या टिप्परमध्ये भरलेली शुद्ध मॅग्निज काढून तेवढय़ाच प्रमाणात बनावटी मॅग्जिन घालून शासकीय मालमत्तेचे नुकसान करीत होते.
देवरी पोलिसांनी त्यांच्याकडून आठ प्लास्टिक पोत्यात काढून ठेवलेले २४0 किलो मॅग्निज (किंमत ९ हजार ६00 रूपये), २२ प्लास्टिक घमेले, दोन टिकास, दोन फावडे, वजन काटे असा एकूण १४ हजार ४५0 रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अग्निहोत्री करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...