नांदेड,दि.01- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यातील हरित क्रांतीचे शिल्पकार कै.वंसतराव नाईक यांचा १ जुलै हा जन्मदिवस.आजपर्यंत हा दिवस कृषीदिन म्हणून सरकारच्यावतीने साजरा करण्यात येत आहे.परंतु विद्यमान भाजप सेनेच्या सरकारने 1 जुर्ले रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे बंजारा समाजाचे प्रमुख राहिलेले आणि महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे प्रणेते असलेले कै.वसंतराव नाईकांच्या जयंतीचे महत्व कमी करणे असल्याचा आरोप बंजारा समाजाच्यावतीने सरकारवर करण्यात आला आहे.विशेष म्हणजे 25 जानेवारी हा मतदारदिवस म्हणून साजरा करण्यात येत असताना आधी 1 जुर्ले मतदारदिवस साजरा करण्याचा घाट घातला होता.परंतु विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतल्याने आता त्यात थोडा बदल केला असून विशेष मतदारनोंदणी मोहीमेला सुरवात करण्याचा घेतलेला निर्णय सुध्दा बंजारा समाजाचा अवमान करण्यासाठी असल्याने बंजारा समाजाच्यावतीने याचे निषेध नोंदवित तालुका,जिल्हा व गावपातळीपासून निवेदनाच्या माध्यमातून आपला रोष व सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविण्याचे आवाहन बंजारा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment