Tuesday 20 June 2017

गणनेत नवेगावबांधच्या तलावात सारसाचे दर्शन



गोंदिया,दि.१९- दुर्मिळ सारस पक्षी गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. त्यामुळे दूरवरच्या पर्यटकांचे पाय गोंदियाच्या भूमीला लागतात. सारस पाहिल्याशिवाय त्यांना परतीचे वेध लागत नाही.मात्र,वन्यजीव विभाग व सेवा संस्थेच्यावतीने नुकत्याच केलेल्या गणनेत गतवर्षीपेक्षा यावर्षी सारसांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट झाले.यावर्षी केवळ गोंदिया जिल्ह्यात ३२ ते ३५ च्या दरम्यान सारस पक्षी आढळून आले.भंडारा जिल्ह्यात २ व चंद्रपूर जिल्ह्यात १ तर शेजारील बालाघाट जिल्ह्यात ४२- ४५ च्या जवळपास सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष असला तरी सारस पक्ष्यांचे संवर्धन करण्यात यश आल्याचे समाधान सारस बचाव मोहिमेतील युवकामध्ये दिसून आले.
परिणामी, वन्यजीवप्रेमीनी qचता व्यक्त केली आहे.सारस संवर्धनासाठी सेवा ही संस्था काम करीत असून संस्थेचे अध्यक्ष मानद वन्यजीवरक्षक सावन बहेकार व सारस सवर्धंन प्रकल्प प्रमुख आय.आर.गौतम यांच्या मार्गदर्शनात आठ दिवस सारस गणना मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा जिल्ह्यातील ४५ ते ५० ठिकाणी १६ चमूंच्या माध्यमातून करण्यात आली. विशेष म्हणजे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरातील तलावामध्ये यावेळच्या गणनेत सारसजोडी बघावयास मिळाल्याने या भागाचे जुने वैभव परतल्याचे बोलले जात आहे.
निसर्गसंपन्न असलेल्या गोंदियात पर्यटक नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय व्याघ्र राखीव क्षेत्राला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचा वापर पूर्वी qसचनासाठी व्हायचा. आता मात्र हे तलाव पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे,ते स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांच्या काही काळाच्या अधिवासामुळे. विशेष म्हणजे, सारस हा दुर्मिळ पक्षी राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळतो. या पक्ष्याचे संवर्धन करून त्याची वृद्धी व्हावी, याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने सारस फेस्टिव्हलचे आयोजनही करण्यात येते. पर्यटक या फेस्टीवलमध्ये सहभागीदेखील होतात. सारस पाहिल्याशिवाय, छायाचित्र कॅमेरात कैद केल्याशिवाय त्यांना परतीचे वेध लागत नाही. झिलमिली, परसवाडा, चिरामनटोला, पांजरा, कामठा, रावणवाडी, जिरूटोला, बनाथर, बडगाव, सतोना या परिसरात सारस पक्ष्यांचा वावर आहे. पहिल्यांदा २००४- ०५ मध्ये सारस नजरेस पडले. त्यामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड,मध्य प्रदेश राज्यातील पर्यटकांचा लोंढा हळूहळू वाढत गेला. प्रशासनानेही दखल घेतली.मार्च २०१७ मध्ये कामठा- पांजरा मार्गावरील शेतात सारसांची दोन अंडी आढळली. त्यामुळे अंडी संर्वधनाकरिता शेतकरी आणि प्रशासनाने पुढाकार घेतला. वन्यजीव विभागाकडून सारस पक्ष्यांची गणणा होऊ लागली. गतवर्षी गणनेत ३६ सारस आढळून आले. यावर्षी १० व ११ जूनला गणना करण्यात आली. परंतु,या गणनेत केवळ ३२ सारस आढळून आले. चार सारस कमी आढळल्याने वन्यजीव प्रेमीनी qचता व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...