Wednesday 21 June 2017

मंत्रालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


मुंबई, दि. 21 : तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील प्रांगणात योग दिवस साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि द योग इन्स्टिट्यूट, सांताक्रुझ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, वन विभागाचे सचिव विकास खारगे, सहसचिव सुरज मांढरे आदींसह इतर विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक केले.
द योग इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा श्रीमती हंसाजी योगेंद्र यांनी योगाचे महत्त्व सांगताना, स्वस्थ्य राहण्यासाठी चांगले भोजन, नियमित व्यायाम,
पुरेशी झोप आणि मनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. चिंता करून काहीही होत नाही. मन अशांत असल्यास शरीरावर परिणाम होतो. नेहमी आपल्या दिनचर्येत सहज शक्य होतील. योगाचे विविध प्रकार सांगून ‍नियमितपणे योगा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी ऋषी योगेंद्र आणि इतर सहकाऱ्यांनी योगाच्या  विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...