Thursday 8 June 2017

धान भरडाईच्या अनुदानात वाढ

मुंबई,दि.८- धान भरडाईच्या अनुदानात प्रतिक्विंटल ३ रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्यात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे ३९ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. त्यापोटी सरकारकडून सुमार १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 
राज्यात २००२ पासून धानाची खरेदी केली जात आहे. विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि कोकणात धानाची खरेदी होते.  सध्या धानाला १ हजार ४७० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. राज्य सरकारकडून राज्यातील शेतकèयांना ५० क्विंटल पर्यंत अतिरिक्त २०० रुपये बोनस दिला जातो. राज्यात यावर्षी यापर्यंत ३९ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. पुढील टप्प्यात ही खरेदी ४५ लाख क्विंटल पर्यंत होईल, अशा अंदाज आहे. धानाच्या भरडाईसाठी केंद्रसरकारकडून प्रती क्विंटल १० रुपये अनुदान दिले जाते, तर गेल्या ३ वर्षापासून अतिरिक्त ३० रुपये अनुदान दिले जाते. त्यानुसार यंदाही हे अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापोटी सरकारला सुमारे १५ कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...