Monday 26 March 2018

देवरी येथे मध संकलन प्रशिक्षण व साहित्य वाटपाच्या दृष्टीने जनजागृती मेळावा


गोंदिया,दि.२६ : जिल्हा मानव विकास समिती तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज २७ मार्च रोजी देवरी येथील पंचायत समितीच्या कृषि भवनात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आग्या मधमाशा मध संकलन, प्रशिक्षण व साहित्य वाटप करण्याच्या दृष्टीने जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वन व जंगल भागात आग्या मधमाशांचे मध आदिवासी व बेरोजगार बांधव मोठ्या प्रमाणात संकलीत करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे ज्ञान व प्रशिक्षण नसते. पारंपारीक पध्दतीने पिळका व अशुध्द पध्दतीने मध संकलन केले जाते. अशा मध संकलन पध्दतीमुळे नैसर्गीक मधमशांच्या वसाहती नाश पावत आहे. त्यामुळे आदिवासी व बेरोजगार व्यक्तींना शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलन करण्यासाठी प्रशिक्षण देवून त्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने या जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उपस्थित राहून प्रशिक्षण घेण्यास इच्छुक व्यक्तींनी कार्यक्रमस्थळी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी श्री. आसोलकर (९४०५१५२८२१) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...