Friday 9 March 2018

RTE-25% प्रवेशाची पहिली सोडत १२ मार्च रोजी- शिक्षणाधिकारी (प्राथ.)

गोंदिया: ९ मार्च (बेरार टाइम्स )
बालकाचा मोफत व सक्तीचा  अधिकार अधिनियम २००९ मधील कलाम १२ नुसार नुसार वंचित आणि व दुर्बल घटकातील बालकांना खाजगी विना अनुदानित नामांकित शाळेमध्ये २५ % मोफत प्रवेश देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . सदर प्रक्रिया सत्र २०१७-२०१८ मध्ये ONLINE पद्धतीने राबविण्यात येत असून १३७शाळांनी बालकांना प्रवेश देण्याकरिता शाळा नोंदणी केली आहे . १३७ शाळा मधील १०२९ जागे करीत २११२ पालकांनी ऑनलाईन प्रवेश नोंदणी केली आहे . सदर  प्रक्रियेचा पहिला ड्रा लॉटरी  १२मार्च २०१८ रोजी दुपारी १२ वाजता कार्यालय सर्व शिक्षा अभियान जि .प. गोंदिया खोली क्र . २०२ येथे आयोजित करण्यात आलेला आहे . निवडक पालक , शिक्षक ,अधिकारी यांची उपस्थितीत ड्रा काढण्यात येणार आहे ड्रा  झाल्या नंतर लगेच पालकांच्या मोबाइलला वर संदेश येणार आहेत व कोणती शाळा मिळाली किंवा मिळाली नाही याची माहिती मिळणार आहे. करीत पालकांनी त्यांच्या मोबाइलला वर आलेले सादर संदेश मिटवू ( DELETE)नये . आवश्यकते नुसार २ रा व ३रा ड्रा  होणार आहे . दि. १४ व २४ मार्च  २०१८ या दरम्यान पालकांनी प्रत्येक्ष शाळेत जाऊन प्रवेश घेणे आहे .  या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रम संयोजक नितेश खंडेलवाल , दिलीप बघेले सहायक कार्यक्रम अधिकारी व उल्हास नरड शिक्षणाधिकारी प्राथ. डॉ. राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी जि .प गोंदिया यांनी केले आहे .  

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...