 |
भेट वस्तू दाखवितानां महिला शिक्षिका |
देवरी : ०८ मार्च
 |
भेट वस्तू देतांना मुख्याध्यापक सुजित टेटे |
ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील महिला शिक्षिकांना मान देऊन प्रमुख अतिथींचे स्थान देण्यात आले होते. वैशाली मोहुर्ले, सरिता थोटे , प्रगती कुंडलकर , कलावती ठाकरे ,हर्षदा चारमोडे , मनीषा काशीवार , वैशाली टेटे , संगीत काळे आणि नलू टेंम्भरे उपस्थित होते. सादर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी केले होते . जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला शिक्षिकांना मुख्याध्यापकांनी भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या . सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले . पुरुष प्रधान संस्कृतीतून महिलांचा पुढाकार या विषयावर चर्चा करण्यात आली . ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊ चा शिवबा झाला , ज्याला स्त्री बहीण म्हंणून कळली तो मुक्ताईचा ध्यानदेव झाला , ज्याला स्त्री मैत्रीण म्हंणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हंणून कळली तो सीतेचा राम झाला. या सुंदर ओळी या वेळी व्यक्त करण्यात आल्या . या वेळी भदाडे आणि गुंजन भांडारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व पुरुष शिक्षकांनी सहकार्य केला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी केला असून आभार प्रदर्शन धारणा कोल्हारे विद्यार्थिनींनी मानला .
No comments:
Post a Comment