Tuesday 20 March 2018

रस्ते बांधकामात श्रीमंतांना झुकते माप



देवरी,दि.20ः-देवरी नगर पंचायतीद्वारे सध्या सुरू असलेल्या रस्ते व नाली बांधकामामध्ये श्रीमंतांना झुकते माप देवून सर्वसामान्य नागरिकांच्या बांधकाम तोडले जात असल्याचा रोष नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. शहरात नगर पंचायतीतर्फे सध्या रस्ते व नाली बांधकाम सुरू आहे. परंतु, ही विकास कामे करताना मुख्याधिकार्‍यांकडून भेदभाव केला जात असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी जेथे सर्वसामान्य नागरिकांची घरे आहेत, त्यांचे घर, दुकान, सुरक्षाभींतीचा काही भाग तोडून रस्ते व नाल्याचे बांधकाम केले जात आहे. तर ज्या ठिकाणी श्रीमंतीची घरे आहेत व त्यांचे घरे वा सुरक्षाभींत बांधकामात आड आहेत, त्यांना अभय देवून बांधकाम केल्याचे दिसत आहे. त्यामुळे श्रीमंताना अर्थपूर्ण संबंधातूनच मुख्याधिकार्‍यांनी अभय दिले असल्याचा रोष नागरिकांमध्ये व्यक्त केला जात असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...