Tuesday 6 March 2018

ग्रामपंचायत सदस्याने घेतला दोन वेळा घरकुल योजनेचा लाभ


लाखनी,दि.06ः-तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य भीमराव श्रीराम भोवते यांचे सुस्थितीमधील सिमेंट विटाचे स्वमालकीच्या घरकुलात वास्तव्य असताना आर्थीक वर्ष २0१७-१८ मध्ये पुन्हा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यांना घरकुल मंजूर करण्यात आल्याचा संशयास्पद प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या काम-काजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून भोंगळ कारभाराचे दर्शन होत आहे.
ग्रामीण भागातील निवार्‍याची सोय नसलेल्या बेघर तथा जिर्ण किंवा मोडकळीस घरामध्ये वास्तव्यास असलेल्या अनुसूचित जाती जमाती व आर्थीक दुर्बल घटकातील एक लाख रूपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या गरीब कुटूंबाला शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. ग्रामसभेने शिफारस केलेल्या कुटूंबाची ग्रामपंचायतमार्फत स्थानिक व पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यख मौका चौकशी करून अंतिम लाभार्थी यादी तयार केली जाते.
ग्रामपंचायतीचे सदस्य भिमराव भोवते यांना यांना १0 ते १२ वर्षापूर्वी इंदिरा आवास योजने-अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. विटा सिमेंटने तयार केलेल्या घरकुलात त्यांचे कुटूंबासह वास्तव्य आहे असे गावकर्‍यांनी सांगितले तरीही त्यांना आर्थीक वर्ष २0१७-१८ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला असून बांधकाम सुरू असल्याचे गावकर्‍यांकडून माहिती प्राप्त झाली.
घरकुल योजनेचा लाभ देण्याअगोदर ग्रामपंचायतमार्फत स्थानिक व पंचायत समिती प्रशासनाकडून मौका चौकशी केली जाते. त्यानंतरच घरकुल योजनेचा लाभ दिल्या जातो. या ग्रामपंचायत सदस्यांचे वास्तव घरकुलात असल्याचे चौकशी अधिकार्‍यांच्या कसे निदर्शनास आले ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्रकारामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व पंचायत समिती प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह करणारा असून, एकाच व्यक्तिला २ वेळा घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...