जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने मनरेगाच्या कामाला प्राधान्य देत विविध कामांना सुरुवात केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील ५० टक्के कामे सुरू करण्यात आली आहे. या कामामध्ये घरकुलांचा कामाचाही समावेश आहे. यासह पांदन व सिमेंट रस्ते, भात खाचर, नाला सरळीकरण यासारखी कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत. ही कामे बरोबर सुरू आहेत. की नाही तसेच गावातील गरजू नागरिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला की नाही, याची माहिती मुकाअ. डॉ. राजा दयानिधी कामाच्या स्थळी जाऊन घेत आहेत. त्या अनुसंगाने १४ मार्च रोजी तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावर जाऊन त्या कामाची पाहणी केली. तसेच संपुर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह नरेगा.चे उपमुकाअ. तसेच सरपंच कंठीलाल पारधी, माजी पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी, ग्रामसेवक पी.एम. गौतम, उपसरपंच सप्नील महाजन, ग्रामरोजगार सेवक मोहन पारधी आदी उपस्थित होते.
Friday, 16 March 2018
सीईओ दयानिधींची सेजगाव तलाव खोलीकरणाच्या कामाला भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment