Thursday 8 March 2018

ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार 100 टक्के शिष्यवृत्ती


ओबीसी मंत्रालयाने काढला शासन निर्णय

गोंदिया,दि.08ः- विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मगास प्रवर्ग कल्याण(ओबीसी मंत्रालय) विभागाने ३० जानेवारीला काढलेल्या आदेशात विद्यार्थ्यांच्या खातात मंजूर झालेल्या 50 टक्के रक्कमेच्या 60 टक्के रक्कम म्हणजे 30 टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता.सोबतच स्टॅम्पपेपरवर हमीपत्राची मागणी केली होती.या दोन्ही मुद्यांच्या विरोध राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यसरकारकडे नोंदविला होता.सोबतच अनुसूचिज जाती व जमातीच्याविद्य्ार्थ्यांना ज्याप्रमाणे शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वितरण करण्यात येत आहे,त्याचप्रमाणे करण्याची मागणी केली होती.त्या मागणीचा सकारात्मक विचार राज्यसरकारसह ओबीसी मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला असून विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागांच्या केंद्र व राज्य योजनामधील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यिृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क 100 टक्के निधी विद्यार्थ्यांना
मंजुर करण्याबाबतचा निर्णय घेत त्यासंबधीचे शासन आदेश विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाने 7 मार्च रोजी काढला आहे.या निर्णयामुळे ओबीसींच्या विद्यार्थ्यांना आत्ता 100 टक्के शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सरकारने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर त्वरीत निर्णय घेतल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विभागाचे मंत्री प्रा.राम शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मगास प्रवर्ग कल्याण विभागाने ३० जानेवारीला नव्या अद्यादेश जारी केला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यात मंजूर झालेल्या ५० टक्के रक्कमेच्या ६० टक्के रक्कम म्हणजेच ३० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार होते. हा निर्णय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे सरकारच्या लक्षात आणून देण्याचे काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाने करीत  ईमाव,विजाभज(ओबीसी)मंत्रालयाने सुध्दा 100 टक्के रक्कम विद्यार्थ्यांना द्यावी अन्यथा आंदोलनात्मक प्रवित्रा घेण्याचा ईशारा दिला होता.त्याची दखल व लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ओबीसीं विद्यार्थ्यांच्या खात्यात 100 टक्के रक्कम वळते होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...