नागपूर दि.१३:- कामठी मार्गावर एका बंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बहुतांश मुले धनाढ्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. येथून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कामठी मार्गावरील भीलगावजवळील एका इमारतीमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सहाय्यक निरीक्षक सोपान चिटमपल्ले, गुलाब गिरडकर, राजेश पैडलवार, रूपेश कातरे, उपेंद्र आकोटकर आणि किशोर बिंबे यांनी सापळा रचून रविवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास मोहित गुप्ता याच्या मालकीच्या इमारतीच्या तिसऱ्या माळयावर छापा टाकला. त्या ठिकाणी ३८ जण हुक्का पित होते व पूल खेळत होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी तीन कार, अनेक दुचाकी असा एकूण २७ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रॉनी रेमंड मायकर, पील दानेश खुशलानी, आशीष अशोककुमार बालानी, इमरान शेख पापा शेख, रोहित नानक शुकरानी, विक्रम सरेशलाल तलरेडा, जफर कलीम मोहम्मद अब्दुल नईम, सुफीयान अनम खान मुर्तजा खान, दिपेश अशोक कटारिया, मनीष किशोर तेजवानी, आकाश मूलचंद उत्तमचंदानी, जलत सुरेश ग्यानचंदानी, हितेश मोहनलाल जेठानी, वारिस अख्तर मुमताज अहमद, जय नरेश वासवानी, प्रणय विकास रंगारी, साहिल लक्ष्मण तांबे, नेल्सन सयाम मैसी, धीरज मोहनकुमार हरचंदानी, मनीष प्रकाश वासवानी, दिलीप नानकराम कुकरेजा, मोहम्मद जुबेर कुदूश पटेल, शेख गुलाम दानिश अहमद शेख वहीद, गुफरान मोहम्मद शकील अकबानी, अरबाज अहमद अल्ताफ अहमद कुरेशी, मोहम्मद सोहेल मोहम्मद अफजल शेख, मोहम्मद फहीम मोहम्मद असलम, कुमार गंगाराम रूपवानी, कमल गिरधारी लालवानी, अनस शफी नसीमोद्दीन, मोहम्मद शाकीब अब्दुल साजीद शेख, फहीमुद्दीन इकरामुद्दीन सय्यद, हसनकाझी फजलू रहमान काझी, किशोर तोलाराम बनवानी, पंकज अनिल पंजवानी आणि हितेश वासुदेव देवानी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment