Tuesday 6 March 2018

लाचखोर पुरवठा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


सडक अर्जुनी,दि.06: तालुक्यातील खोबा येथील रेशन दुकानाच्या समायोजनाला घेवून पुरवठा निरीक्षक राजेंद्र चांदेकर यांनी एका रेशन दुकानदाराकडून ८ हजारांची लाच मागितली. तडजोड दरम्यान ५ हजारांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक राजेश चांदेकरला गोंदिया लाचलुचपत विभागाचे सापडा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई (दि.५) सायंकाळी ५ वाजता सुमारास करण्यात आली. आरोपी राजेंद्र चांदेकर विरुद्व डुग्गीपार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा येथील रेशन दुकान काही कारणामुळे निलंबित करण्यात आले होते. निलंबित रेशन दुकान तक्रारकर्ता कनेरीच्या रेशन दुकानात जानेवारी ते एप्रिल २०१७ पर्यंत जोडण्यात आली होती. यासाठी पुरवठा निरीक्षक राजेंद्र चांदेकर यांनी तक्रारकत्र्याकडून ५ हजाराची मागणी केली. परंतु तक्रारकत्र्याने लाच दिली नाही. त्यामुळे पुरवठा निरीक्षक राजेंद्र चांदेकर याने फेबु्रवारी २०१८ मध्ये तक्रारकत्र्यांच्या कनेरी येथील रेशन दुकानाची तपासणी केली. दरम्यान, दुकानाची नोंदवही, साठा रजिस्टर व इतर बाबी समोर करुन कारवाई करण्याचा धसका दाखविला. त्यातच तक्रारदार २७ फेबु्रवारी रोजी चांदेकर यांच्याकडे मार्च महिन्याचा माल पास करण्ययासाठी गेला असता प्रकरणाची विल्हेवाट लावण्याकरिता पुन्हा ५ हजार रुपयाची लाच मागितली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने गोंदिया लाचलुपचत विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली. ५ मार्च रोजी लाचलुचपत विभागाने प्रकरणाची शहनिशा केली असता पुरवठा निरीक्षक चांदेकर यांनी रेशन दुकानाच्या समयोजनासाठी ३ हजर रुपये व कनेरी येथील दुकानावरील कारवाई टाळण्यासाठी ५ हजार असे एकूण ८ हजार रुपयाची लाच मागीलली असल्याची बाब समोर आली. तडजोडअंती ५ हजार रुपये लाच देण्यचे ठरले. सोमवार (ता.५) सापडा रचून लाचखोर पुरवठा राजेंद्र चांदेकर याला ५ हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपी राजेंद्र चांदेकर विरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे अधीक्षक आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक दिलीप वाढनकर, प्रमोद चौधरी, सपो दिवाकर भदाडे, पो.हवा. राजेंद्र शेंद्रे, रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन, देवानंद मारबते यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...