Thursday 8 March 2018

जनावरांना कोंबून नेणारे वाहन उलटले


नागपूर दि.८ः: कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी भरधाव जीप उलटली. त्यात नऊ गाई जखमी झाल्या. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर – सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पहाटेच्या सुमारास घडली. घटनेनंतर चालक तेथून पसार झाला. जखमी गाईंना लगेच गोशाळेत हलविण्यात आले.छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथून नऊ गाईंना एमएच-३१/सीक्यू-७५०० क्रमांकाच्या बोलेरो जीपमध्ये कोंबून कत्तलखान्यात नेले जात होते. पहाटेच्या सुमारास दहेगाव (रंगारी) शिवारात बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. त्यात ती जीप उलटली. त्यामुळे त्यातील सर्व गाई जखमी झाल्या. बराच वेळ त्या घटनास्थळीच पडून होत्या. आरोपी जीपचालक घटनास्थळाहून पसार झाला. याबाबत खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून सदर गाईंना गोरक्षण सभेत पाठविले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान जळते, अर्पित पशिने करीत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...