गोंदिया,दि.12 : गोंदिया वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकला १२ शे रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबी ने रंगेहात अटक केली असून एंथोनी निकोलस सायमन असे या वनरक्षकाचे नाव आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार हा खमारी रोप वाटिकेत रोजंदारीचे काम करतो.दि.३ मार्च रोजी आरोपीने तक्रार दाराशी खमारी रोप वाटिकेत जून ते जुलै या महिन्या पर्यंत नियमित काम देन्यासाठी १२ शे रुपयांची लाच मागितली पण तक्रार कर्त्याची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.त्या तक्रारीची गंभीर दखल घेत आज एसीबी ने सापळा रचून आरोपी वनरक्षकाला रंगेहात अटक करून गोंदिया (ग्रामीण)पोलीस स्टेशन मध्ये आरोपीवर गुन्हा दाखल केला.हि कार्यवाही पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील,नागपूर, यांच्या मार्गदर्शनात गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी रित्या पार पाडली.
Monday, 12 March 2018
वनरक्षक 1200 रुपयांची लाच घेतांना अटक
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment