Monday 1 May 2017

सिमेंट कंपन्यांना गडकरींचा इशारा




नागपूर - उत्पादनावर नफा कमावण्यास आपली मनाई नाही; मात्र साखळी करून ग्राहकांची लुटमार केली जात असेल, ग्राहकांना ब्लॅकमेल केले जात असेल, तर खपवून घेणार नाही. सिमेंटच्या किमतीत शंभर रुपयांनी वाढ केल्यास अशा कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिला.


'देशभरातील सिमेंट रस्त्यांच्या जाळ्यांमुळेच सिमेंट कंपन्यांना पुनरुज्जीवन मिळाले. आता मागणी वाढताच काही कंपन्यांनी भाव वाढवून फायदा घेण्याचे ठरविले आहे; मात्र आपण तसे होऊ देणार नाही. अशा कंपन्यांचा शोध घेऊ त्यांना ठोकून काढू. एवढेच नव्हे तर बंद पडलेल्या सिमेंट कंपन्या पुन्हा सुरू करू. शंभर रुपयात सिमेंटचे पोते विकून कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढली जाईल,'' असा इशारा गडकरी यांनी दिला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...