Friday 12 May 2017

ग्रामसेवक बदली संदर्भात दबावतंत्राचा वापर



  • ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार
  • मुकाअकडे केली तक्रार

गोंदिया,दि.१२- गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवक पदाच्या बदली संबंधाने काल गुरुवारी (दि.११) जि.प. सभागृहात समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जि.प. अध्यक्षांनी दबावतंत्राचा वापर करत बदली संदर्भातील सर्व नियमांना धाब्यावर बसविल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. परिणामी, ग्रामसेवकांवर झालेला अन्याय दूर करण्यात आला नाही, तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुकाअ यांना दिलेल्या निवेदनातून संघटनेच्या पदाधिकाèयांनी दिला आहे.
सविस्तर असे की, काल गुरुवारी जि.प. च्या सभागृहात जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या बदल्या या सामंजश्याने आणि सोयीनुसार करण्यासाठी ग्रामसेवकांच्या समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या बदली प्रकरणात शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन होऊ नये, व कर्मचाèयांच्या हिताचे संरक्षण व्हावे,असा उद्देश या कार्यशाळेचा होता. मात्र, जि.प. अध्यक्ष यांनी समुपदेशन होत असलेल्या सभागृहात पुरुष शस्त्रधारी अंगरक्षकाची नेमणूक करून कर्मचाèयांवर दबाव आणल्याचा संघटनेचा आरोप आहे. महिला कर्मचाèयांना सुद्धा सभ्य वागणूक देण्यात आली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. बंद सभागृहात हुकूमशाही पद्धतीने समुपदेशन घेण्यात आले. यावेळी होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाèया पदाधिकाèयांना सुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यामुळे ग्रामसेवक संघटनेने यावर बहिष्काराचे शस्त्र उपसले आहे.
यावेळी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी वगळण्यात आली, शासकीय नियमाप्रमाणे रिक्त पदे प्रसिद्ध करण्यात आली नाही,अपंग कर्मचाèयांना डावलण्यात आले, प्राधान्यक्रमाचे पालन करण्यात आले नाही, पती-पत्नी एकत्रीकरणाचा प्राधान्यक्रम नाकारणे आणि दबाव तंत्राचा वापर करून समुपदेशन करणे आदी प्रकार कार्यशाळेत घडल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे. या प्रकरणातील झालेला अन्याय दूर करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामसेवक संघटनेने निवेदनातून दिला आहे.
निवेदन देते वेळी संघटनेचे अध्यक्ष कार्तिक चव्हाण,सचिव प्रदीप ठाकरे,कमलेश बिसेन,वनिता कांबळे, पी बी कटरे, योगेश रुद्रकार,लक्ष्मण ठाकरे, पी एम समरित, जी जी जमईवार, आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...