Tuesday 9 May 2017

कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार : गडकरी

 























पुणे, दि.08- प्रगत जैव-रिफायनरी तंत्रज्ञानाद्वारे बायोमासच्या विविधतेपासून एकूण १ दशलक्ष लिटर प्रति वर्ष (एमएलपीए) इथेनॉलची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या देशाची ऊर्जा स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. शेतातील शेती-कचर्‍यापासून इथेनॉल तयार होणार आहे, असे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात काढले.

देशातील पहिल्या बायो-रिफायनरी प्रकल्पाचे उद््घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दौंड तालुक्यातील पाटेठाण येथे श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्यावर करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारे जैव इंधन पर्यावरणपूरक असून कृषी क्षेत्राला उभारी देणारे असल्याचे गडकरी या वेळी म्हणाले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...