Thursday 4 May 2017

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या


naxalकोंडागाव (छत्तीसगढ) : पोलिसांच्या खबऱ्या असल्याच्या संशयावरून कोंडागाव येथील एका गावकऱ्याची नक्षलवाद्यांनी आज (गुरुवार) हत्या केली आहे.

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) 158 बटालियनने केलेल्या संयुक्त कारवाईत झारखंडमधील लोहारगड येथे नक्षलवादी लपलेल्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यामध्ये लाईट मशिन गन, रायफल, एके 47, स्वयंचलित रायफल, संवादासाठीची प्रणाली अशी काही सामुग्री जप्त केली आहे. अलिकडेच नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 25 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर सुकमा, छत्तीसगढ येथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोंडागाव येथे मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या पुतळाचे दहन केले. दहशवादी आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपले जवान हुतात्मा होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथसिंह आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह केवळ निषेध करत असल्याबद्दल काँग्रेसने टीका केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...