Friday 5 May 2017

अतिरेक्यांनी देशभक्त तरुणांचे केस कापले!

श्रीनगर,दि.5-विशेष पोलीस दलासाठी काम करणाऱ्या तीन देशभक्त काश्मिरी तरुणांचा हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांकडून छळ केला जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरमध्ये शूट केलेला असून या तिघांना गद्दार म्हणत त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात येत आहेत.

भरलेल्या बादलीत या तिघांची डोकी बुडवून त्यांना बेदम मारहाण केली जात आहे. त्यांचे केसही कापले जात आहेत, असे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. 'पोलीस फोर्स जॉइन केली आता तुमचे केस तर कापावेच लागतील', अशी शेरेबाजीही व्हिडिओत ऐकू येत आहे. हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरमधील नेमका कुठच्या भागातील आहे, हे मात्र कळू शकलेले नाही.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...