Friday 5 May 2017

फेसबूकने आणली 'वाय-फाय एक्स्प्रेस', बिनधास्त वापरा इंटरनेट



नवी दिल्ली, दि. 5 - सोशल मीडिया नेटवर्क कंपनी फेसबूकने आपल्या ‘वाय-फाय एक्सप्रेस ’ सेवेचा गुरुवारी भारतात शुभारंभ केला. या सेवेअंतर्गत फेसबूक ग्रामीण भागातील लोकांना सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबूकने आपली वादग्रस्त 'फ्री बेसिक्स' सेवा बंद केल्याच्या जवळपास एक वर्षानंतर ही नवी सेवा सुरु केली आहे. 
 
'फ्री बेसिक्स' मध्ये काही निवडक वेबसाईट्सवर मोफत पोहोचण्याची सुविधा होती. मात्र वाय-फाय एक्सप्रेस पेड मॉडल असणार आहे. यामध्ये इंटरनेट काही ठराविक वेबसाईट्सपुरतं मर्यादित नसणार आहे. सार्वजनिक हॉटस्पॉटची सेवा घेण्यासाठी लोकांना दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक डाटा पॅक खरेदी करावा लागणार आहे. त्यानंतरच हॉटस्पॉटशी कनेक्ट करणं शक्य होणार आहे. 
 
फेसबूकने आपल्या या नव्या योजनेसाठी दूरसंचार कंपनी एअरटेलसोबत हातमिळवणी केली आहे. कंपनी पुढील काही महिन्यात 20 हजाराहून अधिक वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करणार आहे. फेसबूक आशिया-पॅसिफिकचे कनेक्टिव्हीटी सोल्यूशन्स प्रमुख मुनीष सेठ यांनी सांगितलं आहे की, 'भारताची लोकसंख्या तब्बल 130 कोटी आहे. मात्र फक्त 39 कोटी लोक इंटरनेट वापरतात. एक्स्प्रेस वाय-फायच्या माध्यमातून समाजातील अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा फेसबूकचा प्रयत्न आहे जे अद्यापही इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत'. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...