उत्पादन शुल्क अधीक्षकांना सुटेना अंबर दिव्याचा मोह

देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी लालफिताशाहीला लगाम लावून अतिविशिष्ट व्यक्ती या संस्कृतीवर लगाम कसण्याचे ठरवले आहे. त्यांच्या याच नीतीचा भाग म्हणून खास सेवा मिळविण्यासाठी गाडीवर लावण्यात येणाऱ्या दिव्यांना त्यांनी हटविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे १ मे नंतर शासन-प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या गाडीवर असे दिवे लावण्याची मनाई करण्यात आली. प्रधानमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी १ मे पूर्वीच आपल्या गाडीवरील दिवे हटविले. अनेक मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी १ मे नंतर आपल्या गाडीवरील दिवा वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता वापरणे बंद केले.
मात्र, गोंदिया जिल्ह्यात कार्यरत असलेले राज्य उत्पादन विभागातील अधिकारी यांनी आपले वाहन क्र. एमएच ३१ एजी ९६३३ या वाहनावरील अंबर दिवा अद्यापही हटविला नाही. या अधिकाऱ्यांना शहरातील प्रमुख मार्गावरून जयस्तंभ चौक,जुने आरटीओ कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आदी ठिकाणी या गाडीतून फिरताना पाहण्यात आल्याचे नागरिकांना सांगितले. उल्लेखनीय म्हणजे अतिविशिष्ट सेवा देणाऱ्या वाहनांनाच दिवा वापरण्याची मुभा असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
No comments:
Post a Comment