Saturday 13 May 2017

खोटी माहिती दिल्याने कारागृह पोलीस जेरबंद

यवतमाळ : दरोड्यातील आरोपींची नावे माहीत असल्याची खोटी माहिती दिल्याने येथील जिल्हा कारागृहातील पोलीस कर्मचार्‍याला बीड जिल्ह्यातील धारूर पोलिसांनी जेरबंद केले.
लिहदेव शिखरे असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून, जिल्हा कारागृहात कार्यरत आहे. गत १५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील धारूर येथे दरोडा पडला होता. या दरोड्यामध्ये नागपूर येथील चार व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती दूरध्वनीवरून धारूर पोलिसांना सांगितली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथे जाऊन या व्यक्तींची चौकशी केली. तसेच त्यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स व लोकेशन घेतले असता, ते घटनेच्या दिवशी नागपूर येथेच असून सर्व जण प्रतिष्ठित असल्याचे उघड झाले. त्यावरून या दरोड्यात त्यांचा सहभाग नसून कारागृह पोलीस कर्मचारी शिखरे यांनी माहिती खोटी दिल्याचे समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून शिखरे यांना अटक केली. त्यानंतर धारूर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, शिखरे यांची जमानतीवर सुटका करण्यात आली. याबाबत कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना विचारणा केली असता, या घटनेला दुजोरा दिला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...