Tuesday 9 May 2017

पोलिसठाण्यासमोरच युवकावर प्राणघातक हल्ला

गोंदिया,दि.8 : जुन्या वैमनस्यातून शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया शहर पोलीस ठाण्यामोरच दहा आरोपींनी एका युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले.  ही घटना रविवारी रात्री बाराच्यादरम्यान घडली.
या घटनेत  धीरज तुळशीराम विश्‍वकर्मा (२२), राहणार मनोहर चौक गोंदिया गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा नोंद करून चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावर पोलीस पोहोचले नसते तर मोठी घटना घडली असती. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील मनोहर चौक निवासी धीरज विश्‍वकर्मा हा युवक मोटारसायकलने घराकडे जात असताना जवळपास दहा आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढविला आणि चाकूने सपासप वार करून जीव घेण्याचा प्रय▪केला. ही घटना पोलीस ठाण्यात तैनात पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.समोरच पोलिसांना न घाबरता १0 आरोपींनी युवकावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी रात्री बाराच्यादरम्यान घडली.
या घटनेत मनोहर चौक निवासी धीरज तुळशीराम विश्‍वकर्मा (२२) गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा नोंद करून चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावर पोलीस पोहोचले नसते तर मोठी घटना घडली असती. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील मनोहर चौक निवासी धीरज विश्‍वकर्मा हा युवक मोटारसायकलने घराकडे जात असताना जवळपास दहा आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढविला आणि चाकूने सपासप वार करून जीव घेण्याचा प्रय▪केला. ही घटना पोलीस ठाण्यात तैनात पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी युवकाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...