Saturday 13 May 2017

कुही ग्रा.पं.मध्ये ४0 लाखांच्या गैरव्यवहारावर

नागपूर,दि.13 : जिल्ह्यातील कुही ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सुमारे चाळीस लाखांच्या अफरातफरप्रकरणी जिल्हा परिषदेने तक्रार दिली नाही. यामुळे ग्रा. पं.च्या पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले नाही, असे प्रतिज्ञापत्र कुही पोलिसांनी नागपूर खंडपीठाला दिले. या प्रकरणी हायकोर्टाने ग्रामविकास व जलसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन कुही यांना नोटीस बजावली. या सर्व प्रतिवादींना येत्या १६ जूनपर्यंत हायकोर्टाने उत्तर मागितले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये निधीची अफरातफर झाल्याप्रकरणी कुही येथील निवृत्त शिक्षक उमाजी पांडुरंग पुनवटकर यांनी अॅड पंकज तिडके यांच्यामार्फत याचिका दाखल केली. १२ जून, २0१३च्या जीआरनुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत निधीचा अपहार करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यात जबाबदार असणार्‍या संबंधित सरपंच, उपसरपंच, सचिव आणि कर्मचार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, असे जीआरमध्ये म्हटले आहे. कुही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि कुही ग्रामपंचायत समितीने जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला. १८ सप्टेंबर, २0१४ रोजी दिलेल्या या अहवालात सरपंच ईश्‍वर धनजोडे, ग्रामविकास अधिकारी खाडे, मानेकर, कुंड हे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ११ मे, २0१६ रोजी लेखा परीक्षण अहवालातही उपरोक्त पदाधिकार्‍यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...