नवी दिल्ली दि.08 : सध्या देशातील विविध बँका आपल्या ग्राहकांना खात्यातील शिल्लक, एटीएम कार्ड, केवायसी नूतनीकरण, सह वेगवेगळ्या सेवांसाठी जागृत करत आहेत. त्यांच्या या जागृती मोहिमेकडे काणाडोळा करणे ग्राहकांना महागात पडू शकण्याची शक्यता आहे. एखाद्या ग्राहकाने दोन वर्षांत एकदाही आपल्या खात्याच्या माध्यमातून बँक व्यवहार केला नसल्यास ते खाते बँका बंद करण्याची शक्यता आहे. बँका आपल्या ग्राहकांना एसएमएस, ई-मेल या आधुनिक तंत्रांच्या माध्यमातून अँलर्ट पाठवण्यासोबत संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील इशारा देत आहेत. ग्राहकांनी बँकांकडून आलेल्या अँलर्टकडे दुर्लक्ष करून नये. बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँकेने दोन वर्षांत व्यवहार न झालेले बँक खाते बंद करण्यात येईल, अशी नोटीस आपल्या संकेतस्थळावर झळकवली आहे. तसेच ज्या ग्राहकांच्या खाती शून्य शिल्लक आहे, त्यांनी त्वरित आपले खाते बंद करावे; अन्यथा त्यांचे ते खाते गोठवण्यात येईल. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांनी असे खाते गोठवण्यात येईल. हा नियम चालू आणि बचत या दोन्ही प्रकारच्या खात्यांसाठी लागू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्राहकाने आपल्या बँक शाखेत जाऊन ३0 दिवसांच्या आत अँक्टिव्हेशन विनंती द्यावी, अशी सूचना बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. |
Tuesday, 9 May 2017
दोन वर्षे व्यवहार न झाल्यास बँक खाते बंद?
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment