Monday 15 May 2017

तीन महिन्यांपासून मिळाले नाही आश्रमशाळांच्या शिक्षकांचे वेतन

कुरखेडा, दि.१४: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत काही अनुदानित आश्रमशाळांतील माध्यमिक शिक्षकांना मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने ऐन लग्नसराईत त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.काही अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांना वेतन मिळाले आहे, तर काही शाळांतील शिक्षकांना मात्र अजूनही वेतनाची प्रतीक्षा आहे. माध्यमिक शिक्षकांचे वेतन नॉन प्लॅन हेडअंतर्गत असल्याने वेतन अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होत असते. परंतु योग्य पाठपुरावा न झाल्याने मार्च एन्डींगनंतरचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना फेब्रुवारी २०१७ पासून वेतन देण्यात आले नाही. परिणामी शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...