Tuesday 2 May 2017

डिजिटल शाळा उपक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात दूसरा


देवरी, २ (सुजित टेटे)- आदिवासी आणि अप्रगत अशी ओळख असलेला गोंदिया जिल्हा. आज दिनांक 2 मे 2017 रोजी  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भायंदर ठाणे येथे  आयोजित डिजिटल शाळा पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आल्याबद्दल गोंदिया जिल्ह्याचे शिक्षणाधिकारि श्री उल्हास नरड यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम  मा. सी.विद्यासागर राव , शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 
डिजिटल शाळेमधे गोंदिया जिल्हातिल खेडेगावाचा मोठया प्रमाणात समावेश आहे. येणाऱ्या भावी पिढीला या संकल्पनेचा निश्चितच फ़ायदा होणार आणि उत्कृष्ट विध्यार्थी घडविण्यात ही संकल्पना कौतूकास्पद आहे.
महाराष्ट्रातील खेड्या-पाडयातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आज भाईंदरमधील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते  धुळे, ठाणे, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांमधील डिजिटल शाळा अभियानाअंतर्गत शंभर टक्के डिजिटल झालेल्या शाळांच्या 30 शिक्षणाधीकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी यांच्या सयुंक्त विद्यामाने डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभेचं आयोजन करण्यात आलं होते.  यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार या वेळी उपस्थित होते.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘डिजिटल’ होणार आणि
महाराष्ट्रातील खेड्या-पाडयातील सर्व शाळा डिजिटल करण्याचं लक्ष असून, यात स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...