Thursday 4 May 2017

सुकमा हल्ल्याप्रकरणी चार नक्षलींना अटक

छत्तीसगड, दि. 4 - सुकमा नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी चार संशयित नक्षलींना अटक करण्यात आलं आहे. सीआरपीएफ जवान आणि पोलिसांनी मिळून केलेल्या संयुक्त कारवाईत ही अटकेची कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या नक्षलींमधील एक अल्पवयीन असल्याची माहिती आहे. 24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 25 जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले होते. 
 
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले. 
 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...